प्रार्थना करण्यासाठी येशूने दिलेली रूपरेखा - Jesus' Blueprint for Prayer [Marathi]
प्रार्थना करण्यासाठी येशूने दिलेली रूपरेखा - Jesus' Blueprint for Prayer [Marathi]
आपल्याला ठाऊक आहे कि, प्रार्थना विश्वासणाऱ्यांच्या जीवनाचा एक भाग असणं आवश्यक आहे, आणि तरीही, किती वेळा आपण आपल्या प्रार्थना पापकॉर्न प्रमाणे वर भिरकावतो किंवा किराणा मालाप्रमाणे आपल्या मागण्यांची यादी देवाला सादर करतो? प्रार्थना करणे एक विशेषाधिकार आहे, परंतु कठोर परिश्रम देखील आहे. देवाचा उद्देश्य हा आहे कि आपण त्याला पिता, प्रदाता, क्षमा करणारा, आणि सर्व गोष्टींचा प्रभू म्हणून ओळखावे. प्रार्थने करीता येशूने दिलेली रूपरेखा ही आपल्याला "प्रभुने शिकवलेली प्रार्थना" म्हणून आपले मार्गदर्शन करते, जेणेकरून प्रार्थना कशी करावी इतकेच केवळ नव्हे, तर आपली इच्छा त्याच्या इच्छेनुरूप आहे हे सुद्धा आपणांस समजते.
हेडॉन रॉबिन्सन हे सुप्रसिद्ध वक्ते आहेत व ते अनेक वर्षांपासून रेडिओवर "डिस्कवर द वर्ड" ह्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये वैशिष्ट्यपूर्ण शिक्षकाचे काम करीत होते. विसाव्या शतकामध्ये महान प्रचारकांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे डॉ. रॉबिन्सन, 'हेरॉल्ड जॉन ओकेंगा' ह्या पदवीने सन्मानित प्रतिष्ठित प्राध्यापक, तसेच 'गॉर्डन-कॉनवेल थिऑलॉजिकल सेमिनरी' येथे सन्मानपूर्वक पदवीधारक सेवानिवृत्त वक्ते आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक देखील आहेत, त्यामध्ये "व्हॉट जीजस सेड अबाऊट सक्सेसफुल लिविंग" आणि "डिसीजन-मेकिंग बाय द बुक" ही पुस्तके आहेत.